Breaking
जुन्नर : मटन, चिकन व मासे विक्रीची दुकाने चालू ठेवण्यास परवानगी देण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी


जुन्नर / रफिक शेख : चिकन व मासे विक्रीची दुकाने रात्री ८ पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जुन्नर तालुका उपाध्यक्ष अशफाक तिरंदाज यांनी तहसीलदार हनमंत कोळेकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, आषाढ महिना चालू असून या महिन्यात सायंकाळीच्या वेळेस ग्राहक येत असतात. त्यामुळे धंदा जास्त होतो. तरी मासे, चिकन, मटन ची दुकाने सायंकाळी ८ पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा