Breaking


जुन्नर : हाडाचे शिवसैनिक मागे फिरा तुमच्याशिवाय भगवा फडकणार नाही : शरद सोनवणेसावरगांव या ठिकाणी जुन्नर तालुका शिवसेना शिवसंपर्क अभियान दौरा संपन्न


जुन्नर / रफिक शेख : हाडाचे शिवसैनिक मागे फिरा तुमच्याशिवाय भगवा फडकणार नाही, असे प्रतिपादन माजी आमदार शरद सोनवणे यांनी सावरगांव येथे केले.


जुन्नर तालुक्यातील सावरगांव धालेवाडी तर्फे हवेली जिल्हा परिषद गटा मध्ये शिवसेना शिवसंपर्क अभियान दौरा संपन्न झाला.शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार व युवासेनाप्रमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, दिनांक .१७  जुलै रोजी सावरगाव धालेवाडी तर्फे हवेली या जिल्हा परिषद गटात पार पडला.


त्या‌ प्रसंगी उपजिल्हा प्रमुख शरद चौधरी, तालुका प्रमुख माऊली खंडागळे, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, सभापती ललिता चव्हाण, मा.पं.समिती सदस्य संतोष वाघ, सत्यवान बाळसराफ,उपतालुका प्रमुख मंगेश काकडे, विभाग प्रमुख उत्तम काशिद, उपविभाग प्रमुख आशिष हींगे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत  शिवसंपर्क अभियान दौरा संपन्न झाला.


या प्रसंगी बस्ती चे सरपंच प्रकाश गीदे, रोहिदास गोरडे, माऊली काचळे, रामदास नायकोडी, उदय ढमढेरे, तानाजी जुंदरे, कृष्णा घुले, खंडू शिंदे, भालचन्द्र भगत, शांताराम फुलवर, राजेश खांडगे, प्रभाकर घुले व अन्य मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा