Breaking
जुन्नर : शिवसेनेतील 'हे' पुढारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर ? वाचा सविस्तर


जुन्नर (पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आणण्याचे काम राष्ट्रवादीचे प्रवक्ते भाऊ देवाडे यांनी केले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कडून जिल्हा परिषद अध्यक्ष झालेले देवराम लांडे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाणार असल्याचे स्वतः लांडे यांनी जाहीर केले आहे. 


परंतु देवराम लांडे यांचे विरोधक असलेले काळू शेळकंदे आणि मारुती वायळ सुध्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी देवाडे, लांडे, वायाळ आणि शेळकंदे यांनी श्री क्षेत्र कुकडेश्वर येथे जाऊन हिरडा फँक्टरी चालू करण्याची शपथ घेतली होती. तेव्हा पासून हा चर्चेचा विषय ठरला आहे.

जर हे तिघेही राष्ट्रीय काँग्रेस मध्ये आल्यास पश्चिम आदिवासी भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य वाढणार आहे. तसेच राजकीय समिकरणेही बदलणार आहेत. परंतु "खोबरे तिकडं चांगभलं" काहीशी स्थिती आदिवासी भागातील पुढाऱ्यांची पहायला मिळत आहे. सत्ता तिकडे पुढारी असेच काहीसे समीकरण आतापर्यंतचे राहिले आहे.

देवराम लांडे हे शिवसेनेत असताना त्यांचा मुलगा अमोल लांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे तसेच ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस पदावर आहेत.

येत्या वर्षभरात पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूका होत असल्याने देवराम लांडे हे त्यांच्या मुलाच्या राजकीय भविष्यासाठी राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात आहे. परंतु मुलाच्या राजकीय भविष्यासाठी पाडळी गणातील पुढाऱ्यांची मोट बांधली जात असल्याचेही बोलले जात आहे.

सतत एकमेकांवर टिका करणारे देवराम लांडे आणि मारुती वायळ एकत्र येतील का? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका जवळ येत आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. येणारा काळच ठरवणार आहे. ही एकजूट कायम राहिल की प्रत्येक वेळी समाजाचे नाव घेऊन एकत्र येणारे पुढारी पदासाठी पुन्हा 'एक ला चलो' चा नारा देणार !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा