Breaking


जुन्नर : विनायक खोत यांना शिवनेर भूषण पुरस्कार जाहीर


जुन्नर / आनंद कांबळे : जुन्नर येथील किल्लेसंवर्धन हाच ध्यास घेवून सतत काम करणारे प्रा. विनायक खोत यांना लायन्स क्लब तर्फे शिवनेर भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.


प्रा. विनायक खोत म्हणाले, एका सधन शेतकरी कुटुंबात, छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीत माझा जन्म झाला हे मी माझे भाग्य समजतो. एक सर्वसाधारण विद्यार्थी ते एक किल्ले संवर्धक हा प्रवास आपणांपुढे थोडक्यात मांडत आहे.

माझ्या शालेय जीवनाची सुरवात शाळा क्र.१ (जुन्नर नगर पालिका ),  माध्यमिक शिक्षण शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय, जुन्नर  व महाविद्यलयीन शिक्षण श्री शिव छत्रपती महाविद्यलय, जुन्नर याठिकाणी झाले व या पुस्तकी शिक्षणानंतर ख-या अर्थाने जीवनोपयोगी शिक्षण तेथून पुढे ते आजतागायत घेत आहे.

लहानपणापासून वडिलांना होमगार्डचा गणवेश परिधान करतांना पहायचो, तेव्हांपासूनच भारतीय सशस्त्र सेनेमध्ये अधिकारी म्हणून जायचे हे मनाशी पक्के ठरवले होते. त्यासाठी आदरणीय गुरूवर्य प्रा.मेजर एन.ए.रोकडे सरांच्या मार्गदर्शनाखाली एन.सी.सी. तसेच बास्केटबॉल, हॅन्डबाॅल, टेबल-टेनिस, व्हाॅलीबाॅल, खो-खो, उंच उडी इ.क्षेत्रांमधे प्रगती करत होतो. पण लाडक्या आजीच्या हट्टामुळे सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न भंगले.

मग मोर्चा क्रीडाशिक्षक होण्याकडे वळवला. कलाशाखेची पदवी घेतल्यानंतर सातारा येथील क्रांतिस्मृती शारिरीक शिक्षण महाविद्यलयात प्रवेश घेऊन १९९० मधे श्री शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या मेरीट लिस्टमधे ७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो व ख-या अर्थाने व्यावसायिक जीवनात प्रवेश केला, अर्थात शिक्षकी सेवेचे रुपांतर व्यवसायामध्ये करणे आजपर्यंत जमलेच नाही हे मात्र नक्की.

बालवयापासून छत्रपती शिवरायांविषयी असलेली आेढ शालेय व महाविद्यलयीन काळात वाढतच होती. पण नेमके काय करायचे हे कळत नव्हते. १९८४-८५ सालात आम्ही ६ जणांनी कडेलोटमार्गे शिवनेरी सर केला (वेडेपणाच होता तो, हे आत्ता कळतंय) .पण अजूनदेखील किल्ला म्हणजे काय हे उमगत नव्हते. असेच ९/१० वर्षे जीवन शिक्षणाची लढाई यशस्वी करण्यात निघून गेलो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा