Breaking
जुन्नर : दिव्यांग संघटनेचे विविध मागण्यांना घेऊन तहसिलदारांना दिले निवेदन, पहा व्हिडीओ !


जुन्नर : जुन्नर तालुक्यातील दिव्याग लोकांच्या  विविध अडचणी सोडवण्यासाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव, श्रीमती सुरेखा ढवळे, अनिल मेमाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार हनुमंत कोळेकर नायब तहसीलदार दुधे यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच मागण्यांचे निवेदन दिले.तसेच पंचायत समिती समाज कल्याण कार्यालय व सभापती विशाल तांबे यांच्याशी  सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना सभापती म्हणाले की लवकरच तहसील व पंचायत समिती मध्ये दिव्यांगांच्या प्रश्नावर बैठकीचे आयोजित करण्याचे आश्वासन दिले.

■ दिव्यांग संघटनेच्या मागण्या पुढीलप्रमाणे : 

● शासन निर्णय 18 नोव्हेंबर 2015 च्या अनुषंगाने तालुकास्तरावर दिव्यांग निधी निरीक्षण करण्याकरिता समिती गठीत करावी.

● शासन निर्णय 21 डिसेंम्बर 2020 नुसार दिव्यांग व्यक्तींना विभक्त रेशनिग कार्ड देऊन अन्न सुरक्षेचा लाभ देण्यात यावा.

● दिव्यांगांना पिवळी शिधा पत्रिका देण्यासाठी प्राधान्य ठरून2 घेण्यात यावे. मागील दारिद्र्य रेषेच्या यादीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांजकडून अनुशेष वाढ ऊन घेण्यात यावा.

● तालुक्यातील दिव्यांग बांधवांची ऑनलाईन नोंदणी करून घोशवारा करण्यात यावा.

● दिव्यांग बांधवांसाठी तालुका स्तरावर दिव्यांग कक्ष उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी.

● तालुक्यातील आमदार व खासदार यांच्या फंडातील 5% दिव्यांग निधी खर्च करण्यात यावा.

● तलाठी कार्यालय वरच्या मजल्यावर आहेत त्यांना सूचना देऊन रॅम्प किंवा लीप ची वेवस्था करण्यात यावी.

● तालुक्यातील दिव्यांगाच्या उत्पन्न दाखल्यात 50,000 एवढी मर्यादा असून तलाठी कार्यालयाला सूचना देऊन गाव पातळीवर नोंदणी करून संजय गांधी योजनेत प्राधान्य देण्यात यावे.

यावेळी प्रहार अपंग क्रांति आंदोलन संघटना चे धर्मेंद्र सातव, श्रीमती सुरेखा ढवळे, अनिल मेमाणे, प्रहार रूग्ण सेवक जुन्नर तालुका व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष दिपक चव्हाण, अध्यक्ष अरूण शेरकर, उपाध्यक्ष राहुल मुसळे, कार्याध्यक्ष दत्तात्रय हिवरेकर, सौरभ मातेले, सोमनाथ ढेंगळे, सुनिल जगम, शेख अहमद इनामदार, शरद शिंदे, गणेश माताडेव कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा