Breaking

जुन्नर : सितेवाडी येथील विद्यार्थ्यांची राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने

आंदोलनात सहभागी झालेले सितेवाडी येथील विद्यार्थी

जुन्नर (पुणे) : राज्यातील विद्यार्थी व युवकांच्या विविध मागण्यांना घेऊन स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. 


राज्यभरात विविध ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले असून जुन्नर तालुक्यातील ग्रामीण भागातही या आंदोलनात प्रतिसाद पहायला मिळाला. सितेवाडी तसेच कोटमवाडी येथे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने केली.

आंदोलनात सहभागी झालेले कोटमवाडी येथील विद्यार्थी

■ SFI - DYFI आंदोलनाच्या मागण्या पुढीलप्रमाणे :


1.स्वप्नील लोणकर याच्या कुटूंबियांना शासनाने योग्य ती मदत करून स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना दिलासा द्यावा.


2. आतापर्यंत घेण्यात आलेल्या सर्व एमपीएससी परीक्षांची पूर्तता करावी. तसेच शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार आयोगाच्या सदस्यांच्या रिक्त जागांवर 31 जुलै पर्यंत भरती झाली पाहिजे.


3. सरकारी विभागातील सर्व भरत्या एमपीएससीच्या माध्यमातून कराव्यात. शासकीय विभागातील भरतीसाठी महापोर्टल बंद करावे. सरकारी विभागासाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेची खासगी एजन्सींना आऊटसोर्सिंग बंद करावी, कारण खासगी एजन्सीमार्फत भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता व अचूकता नसते.


4. विविध सरकारी विभागांमधील सर्व रिक्त जागा घोषित कराव्यात. भरती प्रक्रिया पुरेशा पारदर्शकतेने पूर्ण झाली पाहिजे.


5. विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गातून काढून टाकणार्‍या खासगी शाळांचा परवाना सरकारने रद्द करावा.


6. खासगी शाळांमध्ये  50% फी कमी करावी. हे नोंद घेण्यासारखे आहे की, वर्ग ऑनलाईन घेण्यात आल्यामुळे गेल्या वर्षी शाळांचा ऑपरेटिंग खर्च बराच घटला आहे.


8. आरटीई प्रवेश योग्य प्रकारे होत आहेत याची खातरजमा सरकारने केली पाहिजे.


9. आरटीई प्रवेशामुळे खासगी शाळांना फीच्या रकमेचा अनुशेष सरकारने तातडीने दिला पाहिजे.

   

यावेळी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अक्षय घोडे, सचिव प्रविण गवारी, जिल्हा समिती सदस्य रामदास जोशी, मयूर बगाड, दीपक बगाड, साहिल जोशी, रमेश आढारी, प्रियंका जोशी, ऊर्मिला बगाड, समीर जोशी, अश्विनी जोशी व अन्य विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा