Breaking


जुन्नर : चोरी केलेल्या मोटारसायकल विक्रीसाठी आलेले दोघे नारायणगाव पोलिसांच्या जाळ्यात !


जुन्नर / रवींद्र कोल्हे : नायणगाव (दि.२९ जुलै ) जुन्नर येथून चोरी केलेल्या मोटरसायकली नारायणगाव येथे विक्रीसाठी आलेल्या दोन मोटारसायकल चोरट्यांना नारायणगाव पोलिसांनी जेरबंद केले. असल्याची अधिकृत माहिती नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.


याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी युवराज अनिल वाघमारे ( वय २१ वर्ष) रा.निरगुडे ता जुन्नर जि.पुणे) व गणेश रामदास मुळे (वय ४० वर्ष)रा. गुंजाळवाडी ता. जुन्नर जि. पुणे) या दोघांना नारायणगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

मंगळावर (दि २७ जुलै ) रोजी नारायणगाव एसटी स्टँड येथे दोन इसम ची मोटार सायकल विक्रीसाठी येणार आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सहायक पोलिस निरीक्षक ताटे  यांनी लागलीच पोलीस पथक मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी रवाना केले व बातमी च्या आधारे आणि वर्णनानुसार दोन इसम हे एक मोटर सायकल घेवून एसटी स्टँड आवारात आले असता; पोलीस पथकाने सापळा रचून सदर इसमांना ताब्यात  घेऊन त्यांना त्यांच्याकडे असणारे मोटरसायकल बाबत त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यांनी सदर मोटार सायकल ही जुन्नर येथून चोरी केल्याची कबुली दिली असून सदर गाडीची पाहणी करता तिचा आर टी ओ नंबर एम एच १४ यु १८४८ असा असून ती जुन्नर येथील पुष्पंजली को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी जुन्नर येथून चोरी केल्याचे सांगितले.

हा गुन्हा जुन्नर पोलीस स्टेशनला दाखल असून गुन्ह्याच्या अनुषंगाने सदर आरोपी व मोटरसायकल असे जुन्नर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगीरी पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांचे मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहा.पोलिस निरिक्षक पृथ्वीराज ताटे पो.स.ई. सुनित धनवे व पो.ना.पालवे पो. कॉ.कोबल, पो. कॉ. वाघमारे, पो. कॉ. कोळी, पो. कॉ. ढेंबरे, पो कॉ तांबे यांचे पथकाने केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा