Breaking


जुन्नर : आंबे - हातवीज घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प


जुन्नर : जुन्नर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे आंबे - हातवीज घाटात दरड कोसळली असून वाहतूक ठप्प झाली आहे.


आंबे - हातवीज घाटात दरड कोसळल्यामुळे ये - जा करण्याचे मार्ग बंद झाले आहेत. एक रस्ता असलेल्या वरील भागात आंबे, हाजविज, पिंपरवाडी, ढेंगळेवाडी, पसारवाडी, माळवाडी आदीसह वस्त्या आहेत. त्यामुळे नागरिकांना जुन्नरडे जाण्यासाठीची गैरसोय होणार आहे.


दवाखान्यासाठी जुन्नरला जावे लागते, अशावेळी नागरिकांची गैरसोय होऊ नयू त्यासाठी लवकरात लवकर रस्ता वाहतूकीसाठी सुरळीत करण्याची मागणी राष्ट्रीय आदिवासी अधिकार मंचाचे गणपत घोडे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा