Breaking
जुन्नर : चावंड येथे विहिरीत महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळचावंड (जुन्नर) : जुन्नर तालुक्यातील शिरोली पूर गावच्या हद्दीतील विहिरीत विवाहित महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.


दिपाली लालू शेळकदे (वय २२) असे मृतदेह आढळलेल्या महिलेचे नाव आहे. दिपाली यशवंत डामसे (माहेर कडील नाव) यांचे माहेर इंगळुन असून या महिलेचा लालू शेळकंदे त्यांच्या सोबत आठ ते नऊ महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. मंगळवारी (ता. ६) रोजी रात्रीच्या वेळी दिपाली या घरात नसल्याचे घरातील लोकांना समजताच त्यांनी आजूबाजूला चौकशी करण्यास सुरुवात केली. मात्र कुठेही त्या सापडल्या नाही. त्यानंतर दिपाली या हरवल्याची (मिसिंग) तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली होती.


दरम्यान, आज (ता. ८) सकाळी शिरोली पूर गावच्या हद्दीतील (कुकडेश्वर फाटा) दिघे यांच्या विहिरीत दिपाली यांचा मृतदेह आढळून आला असल्याची माहिती चावंड गावचे पोलीस पाटील स्वरूप शेळकंदे यांनी जुन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांना दिली. त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब येऊन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.


या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा