Breaking
जुन्नर : मुथाळने येथे कामगार घेऊन जाणाऱ्या पीकअप गाडीचा अपघात, अनेक मजूर जखमीजुन्नर : जुन्नर तालुक्यातील मुथाळणे येथील येसरठाव या घाटात पिकअप गाडीचा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र यात अनेक मजूर जखमी झाले आहेत.अ.नगर जिल्ह्यातील पळसंडे गावातील कचरेवाडी येथील कामगार घेऊन बनकर फाटा या ठिकाणी कामासाठी जाणाऱ्या पिकअप गाडीचा अपघात झाला. या घाटातील रस्ता खराब असल्याने आणि तीव्र चढ असल्याने गाडीने दम तोडला, त्यातच गाडी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी पुन्हा उताराने मागे येऊ लागली, त्यावेळी लोकांनी गाडीतून उड्या घेतल्या त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र यात काहींना गंभीर जखम झाली आहे. या गाडीतून जवळपास २५ मजूर कामासाठी जात होते.दरम्यान, जखमी मजुरांना ओतूर येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा