Breaking


मोठी बातमी : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामाबंगळूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल थावरचंद गहलोत यांच्याकडे सोपवला आहे. 


येडियुरप्पांची मुख्यमंत्री ही चौथी टर्म आहे. त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी येडियुरप्पा यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले होते.


बी एस येडीयुरप्पा यांनी म्हटले की, मुख्यमंत्री पदावरुन पायऊतार झालो तरी, आपण राजकाणात सक्रीय राहणार असून, भविष्यात पक्षात कोणतेही पद मागणार नाही. तसेच, पक्षाला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत राहू असेही ते म्हणाले.


दरम्यान, राजीनामा देण्याबाबतचा निर्णय आपण स्वच्छेने घेतला आहे. त्यासाठी आपल्यावर कोणाचाही दबाव नव्हता असेही येडियुरप्पा यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा