Breaking

खेड : नायफड गावातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी


खेड : नायफड गावातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी ग्रामस्थांनी एका पत्राद्वारे जिल्हा परिषद सदस्य अरूण चांभारे, व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे युवा अध्यक्ष किरण वाळुंज यांच्याकडे केली आहे.


यामध्ये नायफड गावातील नाव्हाचीवाडी येथील रखडलेला पाण्याच्या टाकीचा प्रश्न मार्गी लावणे, तसेच नाव्हाचीवाडी येथील बंधारा, सभा मंडप, वस्त्यांना जोडणारे अंतर्गतरस्ते हे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे.

यावेळी नायफड गावचे ग्रामपंचायत सदस्य सुनिल मिलखे, वाघोबा अदिवासी तरुण मंडळाचे अध्यक्ष अनिल मिलखे, संजय मिलखे, राहुल तिटकारे, सागर कावळे, रोहन ठोकळ, सुरेश काठे, रामदास भाऊ ठोकळ हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा