Breakingखेड : नायफड ग्रामपंचायतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी केले दरवाजे बंद ? पहा नक्की काय झाले !


खेड : बुधवारी २१ जुलै रोजी रात्री अतिवृष्टी मुळे नायफड गावातील लिविंग ऑफ आर्ट या संस्थेने बांधलेला मातीचा बंधारा फुटून गावातील शेतकऱ्यांचे भात शेताचे नुकसान झाली होती. तसेच अनेक शेतकऱ्यांची शेते वाहून गेली होती. ही बातमी कळताच खेड तहसीलदार वैशाली वाघमारे व अतुल देशमुख, तसेच आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी भेट दिली होती.त्याच पार्श्वभूमीवर नायफड गावातील ग्रामस्थांनी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्याला न्याय मिळावा यासाठी शनिवारी ग्रामस्थ, नुकसानग्रस्त, बंधारा बांधणारी संस्थेचे अधिकारी व ग्रामपंचायत सरपंच, सदस्य तसेच  ग्रामसेवक इत्यादी लोकांची मिटिंग ग्रामपंचायत कार्यालय नायफडमध्ये घेतल्याचे नियोजन केले होते. यासाठी ग्रामपंचायत ने सुरुवातीला होकार दिला व मिटिंगच्या दिवशी सकाळी सरपंच कळुबाई मेमाणेसह इतर काही सदस्य उपस्थित नव्हते. तसेच ग्रामपंचायत शिपाई यांनी गावातील राजकिय पुढारी व सरपंच यांच्या सांगण्यावरून ग्रामपंचायत न उघडता घरातून पळ काढला, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

ग्रामस्थ व नुकसानग्रस्त नागरिक मदतीचा हात मागण्यासाठी जवळपास तीन तास ग्रामपंचायत समोर बसून होते. आता नुकसानग्रस्त व मदतीसाठी विनवणी करणारे नागरिक दिसूनही त्यांच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केले जात आहे, जाणीवपूर्वक ग्रामपंचायत उडली नसल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.

ग्रामपंचायत सदस्य रोहिदास भाईक म्हणाले, "मी ग्रामसेवक शीतल लकारे याना मिटिंग साठी या अशी विनवणी केल्यावर त्यांनी मिटिंग बोलावणे हा सरपंचाचा अधिकार आहे. ग्रामस्थ्यानच्या सांगण्यावरून आम्ही नाही येऊ शकत नाही, असे उत्तर दिले. तसेच गावातील प्रतिष्ठीत राजकिय पुढाऱ्यांनी सुध्दा या मिटिंगकडे जाणीवपूर्वक पाठ फिरवली असल्याचे ते म्हणाले.

ग्रामस्थांनी गावातील भैरवनाथ मंदिराच्या सभा मंडपातच उभ्याने संस्थेचे अधिकारी नवले व इंजिनियर यांच्याशी चर्चा केली. संस्थेने ग्रामस्थांची जी नुकसान झाली आहे ती आम्ही भरून देऊ या प्रकारचे आश्वासन दिले. व त्यासाठी आम्ही ग्रामपंचायत ला लेखी स्वरूपात नुकसानभरपाईचे हमीपत्र देऊ अश्याप्रकारचे आश्वासन दिलं.

या वेळी ग्रामस्थ निलेश तिटकारे, सुदर्शन तिटकारे, शरद ठोकळ, ओंकार फलके, हैबतराव तिटकारे, दत्ता तिटकारे, सुरेश तिटकारे, संतोष भाईक, सोमनाथ गादेकर, नारायण गाडेकर, मारुती शिंदे, राजू भाईक, सुभाष भाईक त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य रोहिदास भाईक, उपसरपंच दत्तू माळी हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा