Breaking

कोल्हापूर : प्रयोगशाळा तंत्रज्ञांचे तीन महिन्याचे वेतन थकित, काम बंद आंदोलनाचा इशारा


कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्र विभागात प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून काम करणाऱ्या ११ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन तीन महिन्यापासून थकित आहे. त्यामुळे काम बंद आंदोलन करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.


याबाबत निवेदन कर्मचाऱ्यांनी सूक्ष्मजीवशास्र विभागाच्या विभाग प्रमुखांंनी दिले आहे. निवेदनात म्हणून आहे की, एप्रिल, मे आणि जून महिन्याचे वेतन दिलेले नाही. थकित वेतन दि. ११ जुलै पर्यंत न दिल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा