Breaking
कृषी विभागामार्फत बी बी एफ पेरणीविषयी स्थानिक बोलीभाषेत मार्गदर्शनशहादा (ता.१६) : नागझिरी ता. शहादा येथे फेरंग्या विरजा पावरा यांच्या शेतावर कृषि विभागामार्फत सोयाबीनच्या बी बी एफ पेरणी तंत्रज्ञान प्रात्यक्षिकांतर्गत बी बी एफ पेरणी विषयी कृषी विभागामार्फत स्थानिक बोलीभाषेत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी बिजप्रकिया, बी बी यंत्राने पेरणीचे फायदे, पेरणी अंतर, पेरणीची खोली, बी बी एफने तयार होणाऱ्या सर्यांचे फायदे, तसेच पारंपरिक पध्दतीपेक्षा 25-30% उत्पन्नात वाढ होत असल्याचे सांगण्यात आले. यावेळी कृषी सहायक प्रियंका खेडकर, संतोष वळवी, गौतम खेडकर तसेच, रमेश पावरा, आत्माराम महीदे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा