Breakingशालेय पोषण आहार कामगारांचे प्रश्न अधिवेशनात मांडण्याचे आमदार प्रकाश सोळके यांचे आश्वासनबीड : राज्यातील १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देणाऱ्या शालेय पोषण आहार कामगारांचे प्रश्न अधिवेशनात मांडण्याचे आश्वासन आमदार प्रकाश सोळके यांनी दिले आहे.


राज्यातील शालेय पोषण आहार कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. राज्यामध्ये शालेय पोषण आहार कामगारांना ५० रुपये रोज दिला जातो, ५० रुपये रोजा प्रमाणे १५०० रुपये महिना पडतो आणि तो पण १० महिने. या १५०० रुपये मध्ये महिना कसा भागवायचा हा प्रश्न त्याच्या पुढे पडला आहे.इतर राज्यात तमिळनाडु ११,००० हजार रूपये, केरळ १०,८०० रूपये, सिक्कीम ७,००० रूपये, हरियाना ३,५०० रुपये, तेलगंणा ३,००० रूपये आणि महाराष्ट्रामध्ये १५०० रूपये दिले जाते. कोविड- १९ च्या काळामध्ये कामगारांना नियमित १२ महिने मानधन द्या, सेंट्रल किचन प्रणाली रद्द करा, आयकर लागु नसलेल्या कामगाराना ७५०० रुपये महिना द्या इत्यादी सह अनेक मागण्याचे निवेदन देण्यात आले. 


त्यावेळी माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाश सोळके यांनी, मी येत्या अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.


यावेळी जिल्हा सचिव डॉ. अशोक थोरात, वडवणी ता. अध्यक्ष भाग्यश्री सांळुके, वडवणी ता. सचिव मिरा शिंदे, माजलगाव ता अध्यक्ष अशोक पोपळे, ता सचिव विनायक पौळ, धारूर ता सचिव लता खेपकर, बाबुराव राठोड, विद्या सोंळके, विष्णु गुजर, सारीका सोनटक्के, लता शेजुळ, अजिम बेग, रामभाऊ डाके, इत्यादी सह माजलगाव मतदार संघातील ६५ शालेय पोषण आहार कामगार उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा