Breakingब्रेकिंग : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले मनसैनिकांना आवाहन, वाचा काय म्हणाले ठाकरे


मुंबई : राज्यात सर्वत्र पावसानं घातलं असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जितके जमेल तितकी मदत करण्याचे आवाहन मनसैनिकांना एका पत्राद्वारे केले आहे.


राज ठाकरे यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या अवघड परिस्थितीत सर्व महाराष्ट्र सैनिकांना त्यांना जितकं जमेल तितकी मदत त्यांनी पूरग्रस्तांना करावी, आता लोकांचा जीव महत्त्वाचा आहे, नंतर जसा जसा पूर ओसरेल तसा रोगराईचा धोका वाढू शकतो. त्यात लक्ष घालून अत्यंत तातडीने योग्य ती मदत तिथे पोहोचेल असं पाहावं. तसेच, काम करताना स्वतःची काळजी घ्यावी, असेही आवाहन त्यांनी केले आहे. 


महाराष्ट्रावरचं हे मोठे संकट आहे, त्याला तोंड देताना आपल्याकडून कुठलीही कुचराई होता कामा नये, असेही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा