Breaking


महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक - आशा भोसले


मुंबई : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' जाहीर झाला आहे. यानंतर बोलताना भोसले म्हणाल्या 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक'.


पुढे बोलताना त्यांनी म्हटले आहे की, "आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत आणि त्यासाठी आपण सर्वांचे आभारी आहोत. पण महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार वेगळा आहे कारण हा माझ्या मातीने केलेला माझा गौरव आहे. हा पुरस्कार जाहीर होणे म्हणजे घरच्यांकडून माझे कौतुक झाले आहे असे मी मानते, असे श्रीमती आशा भोसले यांनी सांगितले."

या पुरस्कारासाठी मी राज्य शासनाची आभारी आहे. सध्या राज्यात कोविडचे संकट अजूनही संपलेले नाही. तर गेल्या आठवड्यात चिपळूण, सांगली, कोल्हापूर येथे अतिवृष्टीमुळे बरेच नुकसान झाले आहे. राज्यातील परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर सन्मानसोहळा आयोजित करावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा