Breakingमाहूर : SFI च्या शहर अध्यक्षपदी अभिषेक खंदारे तर सचिवपदी महेश कांबळे यांची निवड


माहूर (नांदेड) : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) च्या माहूर शहर सचिवपदी महेश कांबळे तर अध्यक्षपदी अभिषेक खंदारे यांची निवड करण्यात आली आहे.


आज माहूर येथे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाची माहूर शहर कमिटी गठीत करण्यात आली. या वेळी SFI चे माजी कार्यकर्ते कॉम्रेड शंकर सिडाम व गंगाधर गायकवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.


■ SFI शहर कमिटी पुढीलप्रमाणे : शहराध्यक्ष अभिषेक खंदारे, शहर सचिव महेश कांबळे, उपाध्यक्ष तुषार कांबळे, सहसचिव आदेश लांडगे, कोषाध्यक्ष सुरज कांबळे, सदस्य तुषार चौधरी यांची सर्व मताने निवड करण्यात आली.


यावेळी नांदेड जिल्हा कमिटी च्या वतीने जिल्हा सहसचिव कॉम्रेड प्रफुल्ल कउडकर यांनी नवीन शहर कमेटीला शुभेच्छा दिल्या व माहूर तालुका अध्यक्ष विशाल नरवाडे यांनी बैठकीचा समारोप केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा