Breakingमाळीणची पुनरावृत्ती, २७ जण अडकलेसातारा : सातारा जिल्ह्यातील कोंढावळे येथे माळीणची पुनरावृत्ती झाली असून या दुर्घटनेत २७ जण अडकले आहेत. तर अजून काही जण अडकल्याची शक्यता वर्तविली जात आहे.


राज्यात दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मानवी जीवन विस्कळीत झालेले आहे. सातारा जिल्ह्यातील डोंगर दऱ्यात वसलेल्या अजून काही गावांना असाच धोका आहे. प्रशासनाकडे याची आकडेवारी असूनही पुनर्वसनाचा मुद्दा सुटलेला नाही. प्रशासन आणि सरकारच्या नाकर्तेपणामुळे कोंढावळे येथील नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.


तर जिल्ह्यातील पाटण तालुक्यात मोरगाव येथे दरड कोसळून अनेक घरे जमीनदोस्त झालेली आहेत. १२- १५ जण अडकल्याचे समजतेय. यामध्ये एका चिमुकल्या जीव गेल्याचेही समजते. 


पुणे जिल्ह्यातील माळीण येथे देखील काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारची घटना घडली होती. संपूर्ण गावच ढिगाऱ्याखाली अडकले होते. हा धडा घेऊन प्रशासन आणि सरकारने राज्यात अशा घटना होऊ नयेत, यासाठी उपाययोजना करणे गरजेच्या होत्या. परंतु त्या झालेल्या नसल्याचे या घटनेवरून समोर येतंय.


अधिक वाचा : 

ब्रेकिंग : महाडमध्ये ३० घरांवर दरड कोसळल्याची घटना, अनेक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता


मोठी बातमी : पुणे - बंगळुरू महामार्ग वाहतूकीसाठी बंद


कल्याण शहर पाण्याखाली; लोक हैराण, हजारो जनावरांना काढले बाहेर !कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा