Breaking
शाळेत परत आल्यावर दहावीच्या काही मुलींच्या गळ्यात मंगळसूत्र, ग्रामीण भागात बालविवाहात वाढ


औरंगाबाद : कोरोना मुक्त गावातील आठवी  ते बारावी पर्यंत शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांचे वर्ग 15 जुलैपासून सुरू झाले. प्रशासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळून नवीन शैक्षणिक वर्षात प्रथमच विद्यार्थी विद्यार्थिनी वर्गात परतल्याने शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी शाळांना भेट दिली तेव्हा विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद दिसून आला, पण औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील चार ते पाच गावात दहावीच्या काही विद्यार्थिनी मंगळसूत्र घालून वर्गात आल्याचे दिसल्याने वर्गशिक्षक अधिकाऱ्यांना धक्काच बसला, चौकशी केली असता कुटुंबीयांनी लॉकडाऊन च्या काळात लग्न लावून दिल्याचे या मुलींनी खाली मान घालून सांगितले. हे प्रातिनिधीक चित्र संपूर्ण ग्रामीण भागात बालविवाह यांचे वाढते प्रमाण अधोरेखित करणारे आहे.  

              
कोरोना च्या पार्श्वभूमीवर मागील वर्षभरापासून शाळा बंद आहेत गतवर्षी प्रादुर्भाव कमी झाल्यावर काही शाळा सुरू झाल्या होत्या, पण लगेच बंद ही झाल्या, नवीन शैक्षणिक वर्ष जून पासून चालू झाले तरी 14 जुलै पर्यंत ऑनलाइनच वर्ग सुरू होते, मात्र आता ज्या गावात गेल्या महिनाभरात एकही कोरोना रुग्ण सापडला नाही अशा गावात शाळा सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील 595 गावातील 488 शाळांची गुरुवारी घंटी वाजली पहिल्या दिवशी आठवी ते बारावीच्या एकूण 29 टक्के विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. 

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी विविध शाळांना भेट देऊन कोरोना प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी होते की नाही याची पाहणी केली. माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉ.बी.बी.चव्हाण यांनी सांगितले. सुविधांचा अभाव असल्याने ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षण तितकेसे प्रभावी ठरत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह वाढलेला आहे, त्यांच्या शिक्षणातील अडथळे आता पूर्णपणे बंद होतील.

संपादन - आरती निगळे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा