Breaking
मनोज कामडी यांची बिरसा फायटर्सच्या पालघर जिल्हाध्यक्ष पदी निवडपालघर : मनोज कामडी यांची बिरसा फायटर्सच्या पालघर जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. मनोज कामडी हे एक समाजसेवक असून सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. समाजकार्यात ते नेहमी अग्रेसर असतात. तसेच निर्भीड पत्रकार म्हणून सुद्धा त्यांची विशेष ओळख आहे. सुशिलकुमार पावरा संस्थापक अध्यक्ष बिरसा फायटर्स यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २४ जून २०२१ रोजी बिरसा फायटर्स महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी विस्तार व विदर्भ-पुणे विभागातील नवीन शाखा पदग्रहण सोहळासाठी झूम सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत मनोज कामडी यांची पालघर जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.


या सभेला संस्थापक अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, नवनिर्वाचित राज्याध्यक्ष मनोज पावरा, उपाध्यक्ष राजेश धुर्वे, महासचिव राजेंद्र पाडवी, महानिरीक्षक केशव पवार, कार्याध्यक्ष नंदलाल पाडवी, कोषाध्यक्ष दादाजी बागूल, राज्य प्रवक्ता रोहीत पावरा, सल्लागार अॅड. जगदीश पावरा, अॅड.रमेश पावरा, महिला प्रतिनिधी चंद्रभागा पवार, राज्यसदस्य मनोहर पाडवी, देवीदास वसावे, अशोक वळवी, अर्जून जाधव, ठाणे जिल्हाध्यक्ष सतिश जाधव, नाशिक जिल्हाध्यक्ष दिपक सोनवणे यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी उपस्थित सर्व पदाधिकारी यांनी सतीश जाधव यांची बिरसा फायटर्स ठाणे जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच, मनोज कामडी यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.


पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी आपण काम करणार आहोत. तसेच पालघर जिल्हयात बिरसा फायटर्सच्या तालुका शाखा आपण लवकरच वाढवणार आहोत अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित पालघर जिल्हाध्यक्ष मनोज कामडी यांनी व्यक्त केली.


मनोज कामडी यांची बिरसा फायटर्सच्या पालघर  जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्धल उपस्थित पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा