Breaking


करिअरच्या संधी अनेक पण आपला कल ओळखा ; प्रा.मनीष पाटणकर


घोडेगाव,(दि.३१) : शहीद राजगुरू ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय, फलोदे यांच्या वतीने, तळेघर परिसरातील निवडक विद्यार्थी,विद्यार्थिनी यांच्यासाठी करियर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील इयत्ता १० वी व इ.१२ वी पास झालेल्या मुला-मुलींना भविष्यातील करिअरच्या संधी कोणकोणत्या आहेत, याचे मार्गदर्शन व्यवस्थितपणे मिळणे अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर शहीद राजगुरू ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय, फलोदे यांच्या वतीने, तळेघर परिसरातील निवडक विद्यार्थी,विद्यार्थिनी यांच्यासाठी करियर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 

या कार्यक्रमात करिअर विषयक संधी या विषयावर प्रतिभा कॉलेज, चिंचवड,पुणे चे प्रा.मनीष पाटणकर सर यांनी  विद्यार्थ्याना मार्गदर्शन केलें. यावेळी त्यांनी करिअर निवडताना काय काळजी घ्यावी,त्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये व घ्यावयावयाचे परिश्रम याविषयी चर्चा करून मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांशी बोलताना त्यांनी सांगितले कि, करिअरच्या संधी अनेक पण आपला कल ओळखा’.

 

कोविडमुळे सर्व ती काळजी घेत,मर्यादित विद्यार्थी यांच्यासाठी हा कार्यक्रम पार पडला, परंतु कोविड नंतर मोठ्या प्रमाणात असे कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस शाहिद राजगुरु ग्रंथालयाचे अशोक पेकारी यांनी याप्रसंगी व्यक्त केला.


या कार्यक्रमास माजी नायब तहसीलदार विजय केंगले सर  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते दत्ता गिरंगे, मच्छिंद्र वाघमारे, व शाहिद राजगुरु ग्रंथालयाचे अशोक जोशी उपस्थित हेही  होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा