Breaking
मावळ : शेटेवाडी येथील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप


मावळ : संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने जि.प.शाळा शेटेवाडी ता. मावळ जि.पुणे येथील गरजू व मोलमजुरी करणाऱ्या कामगारांच्या २४ मुला-मुलींना शालेय साहित्याचे वाटप आज रविवार दि.१७ जुलै रोजी सकाळी ११ वा करण्यात आले.


शेटेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच रामदास शेटे संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव भरत शिंदे, उपाध्यक्षा रंजना जोशी यांच्या हस्ते एकेरी, दुहेरी, चौरेघी, चौकडी इ वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर, पाटी पेन्सिल, पट्टी,शॉपनर,भिस्किट पुड्यांचे वाटप केले.

यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा रंजना जोशी यांनी संस्थेच्या कार्याची माहिती थोडक्यात दिली. करोनाच्या धर्तीवर काही मोजक्याच विद्यार्थ्यांना साहित्य घेण्यासाठी बोलावले होते. अन्य विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन साहित्य वाटप करण्यात येणार आहे. यावेळी शाळेचे मुख्याध्यापिक सचिन आंब्रुळे यांनी स्वागत केले. 

या प्रसंगी प्रल्हाद शेटे, निवृत्ती शेटे, अक्षय शेटे उपस्थित होते. संस्कार प्रतिष्ठानचे प्रतिभा पुजारी, अनुराधा शिंदे, सिध्दी जोशी, मनोज धुमाळ यांनी संयोजन केले होते. हे साहित्य फेसबुक व वॉटसपवर केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन रंजना जोशी, नलिनी काकडे, मच्छिंद्र राजगुरव, रुपाली नामदे, शशिकांत पंचवाघ यांनी दिले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा