Breaking
मावळ : रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणीतहसीलदारांना दिले माकपने निवेदन


मावळ (पुणे) : मावळ तालुक्यातील सुदवडी, जांबवडे या दिड किलोमीटरच्या रस्त्याची पावसामुळे अतिशय दुरावस्था झाली आहे. त्यामुळे रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने तहसीलदार रावसाहेब चाटे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

मावळ तालुक्यातील सुदवडी, जांबवडे या दिड किलोमीटरच्या रस्त्याची पावसामुळे अतिशय दुरावस्था झाली आहे. हा संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. त्यामुळे वाहन चालकांच्या गाड्या घसरत असून अनेक जण जखमी झाले आहेत.  

गेल्या 8 वर्षापूर्वी रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. त्यानंतर डांबरीकरण न झाल्यामुळे नागरिकांना कामावर जाताना - येताना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरण लवकर करावे अशी नागरिकांचीही मागणी आहे 

पिंपरी चिंचवड शहरातील कामगारांनी
सुदवडी, जांबवडे भागात घरे बांधली आहेत. जिल्हा परिषदेचा निधी असूनही या रस्त्याचे डांबरीकरण रखडले आहे. सुमारे 2 हजारहुन जास्त लोकवस्ती असलेल्या ता गावांतील नागरिकांना अतिशय मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरण लवकर करावे अशी मागणी  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ग्रामीण समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

निवेदन देतेवेळी गणेश दराडे, अपर्णा दराडे, विजय सूर्यवंशी, संभाजी जाधव, विठ्ठल कदम, चंद्रकांत जाधव, पावसु कऱ्हे उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा