Breaking
मावळ : विषारी वायूचा त्रास, स्मशानभूमीच्या स्थलांतराची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी


मावळ (पुणे) : जांबवडे येथील स्मशानभूमी स्थलांतरित करण्याची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख,,मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे जिल्हा परिषदचे मधुसूदन बर्गे, तहसीलदार मावळ यांंच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.


जांबवडे, ता. मावळ येथील वन जमीन गट क्र.३४७/४०८ येथे अतिशय जुनी स्मशानभूमी आहे. येथे गेल्या १० वर्षात गोरगरीब आणि दलित कुटुंबांंनी स्वतःच्या मालकीची घरे बांधली आहेत. भंडारा डोंगराच्या पायथ्याशी असलेली सरासरी १२०० लोकसंख्या असलेल्या जांबवडे या वस्तीपासून १०० फुटावरील स्मशानभूमी मध्ये अंत्यसंस्कार होतात.

तेव्हा मृतदेह ज्वलन होत असताना पार्टीक्यूलेट(PM), सल्फर डाय ऑक्साईड(SO2),नायट्रोजन ऑक्साईड(NO), अस्थिर सेंद्रिय संयुगे(VOC) ई प्रदूषक असलेली हवा, धुराचा प्रवाह वस्तीत शिरतो. त्यामुळे ही स्मशान भूमी वस्तीपासून दूर स्थलांतरित करावी.त्यांनंतरच त्याचे विस्तारीकरण करा, अशी मागणी माकपने केली आहे.

माकपचे पुणे जिल्हा सचिव कॉम्रेड नाथा शिंगाडे, ग्रामीण सचिव कॉम्रेड गणेश दराडे, अपर्णा दराडे, बाळासाहेब शिंदे, सतीश ओहळ, पावसु कऱ्हे, रोहित शिंदे, चेतन शिंदे, सागर शिंदे, दौलत शिंगटे, स्वाती शिंदे यांनी हे निवेदन आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा