Breaking


जागतिक आदिवासी दिनाच्या नियोजनानिम्मित आदिवासी बचाव अभियान कळवण कार्यकारणीची बैठक संपन्नकळवण (सुशिल कुवर) : महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान नाशिक चळवळीतंर्गत, कळवण तालुक्यातील सर्व कार्यकारणी, पदाधिकारी यांची दि. २७/७/२०२१ जुना मार्केट यार्ड कनाशी येथे दुपारी ३:०० वाजता महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियानाचे केंद्रीय अध्यक्ष प्रा.अशोक बागुल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.


कनाशी येथे ९ आँगस्ट जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्याविषयी आदिवासी बचाव अभियान कळवण कार्यकारणीच्या नियोजनाने बैठक झाली. या बैठकीत कळवण तालुक्यात सर्व आदिवासी बचाव अभियान संघटनेचे कार्यकर्ते, अधिकारी- पदाधिकारी उपस्थित होते. 


संयुक्त राष्ट्र संघाद्वारे जाहीर झालेला ९ आँगस्ट हा दिवस १९९३- १९९४ पासून जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. भारत देश हा देखिल संयुक्त राष्ट्र संघटनेचा सहभागी देश आहे. आणि विश्व आदिवासी दिवस साजरी करण्या विषयीच्या संमतीवर भारत सरकारही राजी आहे. पण गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय पातळीवर ९ आँगस्ट जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जात नाही. याची खंत आजही आदिवासी समाजाला वाटत आहे. जागतिक आदिवासी दिवस हा आदिवासी हक्काचा, अस्मिता, संस्कृती, अस्तित्व, आत्मसन्मान जोपासण्याचा दिवस आहे.


आदिवासींचे विविध प्रश्न समजून घेण्याचा दिवस, पण दरवर्षी हा हक्काचा दिवस साजरा करण्यासाठी देखील अधिकाऱ्यांना परवानगी घ्यावी लागते. ह्या व्यवहाराने आदिवासीला दिलेल्या अधिकाराला धरून नाही. आदिवासी हा निसर्ग जतन व संवर्धन करणारा समाज आहे. आदिवासी संस्कृतीत निसर्ग नियम, मानवी जीवन मूल्य आणि निसर्ग संस्कृती जतन व संवर्धन करण्यासाठी जगातील सर्वांनी पुढे आले पाहिजे अशी ह्या बैठकीत चर्चा करण्यात आली.


यावेळी आदिवासी बचाव अभियान नाशिक जिल्हाध्यक्ष रावण चौरे, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉयज फेडरेशनचे के के. गांगुर्डे, जिल्हा महिला संघटक नंदिनी बागुल, कळवण तालुका प्रमुख भरत चव्हाण, तालुका महिला संघटक सविता थविल, ता. सहसचिव सुशिल कुवर, शांताराम बागुल, सुरेश ढुमसे, प्रभाकर बागुल, वामन बागुल, मनोहर गायकवाड, सुरेश कुवर, अंबादास कुवर, विलास कुवर, विनोद गांगुर्डे, योगीता पवार, अश्विनी जोपळे, सुजाता बागुल या बैठकीत कळवण तालुक्यातील पदाधिकारी व विविध आदिवासी संघटनेचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा