Breakingम्हसावद : गणोर गावात अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्याची बिरसा फायटर्सची मागणीम्हसावद : गणोर गावात अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्याची मागणी बिरसा फायटर्सच्या गणोर शाखेच्या वतीने करण्यात आली आहे. या संबंधीचे निवेदन म्हसावद पोलिस ठाण्यात देण्यात आले आहे.


निवेदनात म्हटले आहे की, मागील २५ वर्षा पासून गणोर गावात दारूबंदी आहे‌. परंतु काही महिन्यापासून गणोर गावापासून १-३ कि.मी. अंतरावर गणोर शिवारात गावठी दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने परिसरातील तसेच गावातील अल्पवयीन मुलांमध्ये दारुची अवैद्य विक्रीचे प्रमाण वाढले असल्याचे बिरसा फायटर्सने आपल्या निवेदनात म्हटले आहे.


काही दिवसांपूर्वी गावकऱ्यांनी मिळून दारू विक्रीवर बंदीचा प्रयत्न केला होता. परंतु दुसऱ्या दिवसापासून पुन्हा दारू विक्री सुरू केली गेली. या पार्श्वभूमीवर म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांना निवेदन देण्यात आले.


यावेळी बिरसा फायटर्स शाखा गणोर महिला अध्यक्षा कविता भामरे, उपाध्यक्ष वसंती निकुम प्रसिध्दीप्रमुख वीणा शेल्टे, बिरसा फायटर्स शाखा गणोरचे पुरुष अध्यक्ष राहुल रावताळे, उपाध्यक्ष चंद्रकांत शेल्टे, लक्ष्मण तडवी, सचिन तडवी, सचिव राजेश पावरा, सल्लागार युवराज रावताळे, सदस्य अजित पटले, रविंद्र वळवी, उमेश ठाकरे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा