Breaking
मुखेड : वार्डातील मुलभूत सुविधा सुधारा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा DYFI चा इशारामुखेड (नांदेड) : वार्ड क्र .1 मधील रस्ते, नाल्या, विजेचे खांब व शौचालय इतर मुलभुत सुविधा सुधारा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.


निवेदनात म्हटले आहे की, वार्ड क्र. 1 मधील वाल्मिक नगर व फुले नगर मधील अनेक वर्षापासुन गल्लीतील रस्ते नाल्या नसल्यामुळे गल्लीतील नागरीकांच्या घरामध्ये पाणी शिरत आहे. व अनेक नागरिकांच्या घराजवळ विजेचे खांब नसल्यामुळे रस्त्यामध्ये काळोख पसरला आहे. पावसाळयाच्या दिवस असल्यामुळे नागरीकांना जाण्या - येण्यासाठी त्रास होत आहे. व अंधारामुळे काही सर्प व विचुकिडे निघण्याची दाट शक्यता आहे व त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


तसेच या भागात सार्वजनिक शौचालय आहे, परंतु त्या ठिकाणी जास्त प्रमाणात घाण पसरलेली आहे. त्या ठिकाणी पाणी व इतर सुविधा नाहीत. त्यामुळे महिलांना उघड्यावर शौचालयास बसावे लागत आहे. तरी वार्ड क्र. 1 मधील रस्ते, नाल्या, विजेचे खांब, शौचालय व इतर मुलभुत सुविधा उपलब्ध करुन देवुन सहकार्य करावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे.


निवेदनावर डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे अंकुश माचेवाड, सामाजिक कार्यकर्ते आदी बनसोडे यांची नावे आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा