Breakingनंदुरबार : गुंजाळी येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन


तळोदा : आज दि. 23 जुलै रोजी सर्व देशभर आझाद हिंद सेनेतील झांसी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन कॉम्रेड लक्ष्मी सहगल यांच्या स्मृतिदिना निमित्त आंदोलन व जाहीर सभा घेण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रात अखिल भारतीय जनवादी महिला संघटना,भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ (DYFI), स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया यांचा संयुक्त आंदोलन व जाहीर सभेचा कार्यक्रम घेण्यात आला. नंदुरबार जिल्हयात तळोदा तालुक्यातील गुंजाळी या गावात जाहीर सभा घेण्यात आली. 


यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते कॉम्रेड जयसिंग माळी, तळोदा तालूका सेक्रेटरी कॉ  रुबाबसिंग ठाकरे, जिल्हा कमिटी सदस्य कॉ. अनिल ठाकरे, DYFI चे जिल्हा सचिव कॉ. सुदाम ठाकरे, कॉ. तापीबाई माळी, कॉ. सुभाष ठाकरे, शेतमजूर युनियनचे तालुका सचिव तुळशिराम ठाकरे, भाईदास ठाकरे, कॉ. नवनाथ ठाकरे व मोड, मोहीदा, खेडले, तऱ्हावद, उमरी, गुंजाळी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा