Breaking

सुरगाणा : निसर्गाचे सवर्धन काळाची गरज : सभापती मनीषा महाले


जलपरिषदेच्या 'एक झाड लेकीचे' उपक्रमास प्रारंभ 


सुरगाणा / दौलत चौधरी : कोरोना सारख्या महामारीच्या संसर्गात ऑक्सिजन घटक महत्वाचा ठरला आहे. या ऑक्सिजन अभावी अनेकांना उभ्या जीवनातून मुकावे लागले आहे. दिवसेंदिवस जगलांचा होणारा ऱ्हास, चोरटी जंगलतोड, संवर्धन आणि संगोपन नामशेष होत चालले आहे. यामुळे अनेक जंगले लयास होत चालली आहेत. निसर्गाने दिलेली देणगी फक्त नावापुरतीच जंगलांच्या तालुक्यात उरली आहे. जंगलांचे संवर्धन व संगोपनासाठी आज काळाची गरज निर्माण झाली असून यासाठी सर्वांनीची पुढाकार घ्यावा असे आवाहन सुरगाणा पंचायत समितीच्या सभापती मनीषा महाले यांनी केले. जलपरिषद मित्र परिवाराच्या एक झाड लेकीचे या उपक्रमाच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. ठाणगाव (ता.सुरगाणा) येथून या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला आहे.

जलपरिषद मित्र परिवाराने त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा सारख्या आदिवासी बहुल भागांत ग्रामस्थांच्या श्रमदानातुन वृक्ष लागवड, जनजागृती मोहीम हाती घेत हजारो विविध जातींच्या  झाडांचे वृक्षरोपन केले आहे. ही बाब अभिमानस्पद आहे. वृक्ष लागवडीच्या पायंड्याबरोबरच जलपरिषदने 'एक झाड लेकीचे' उपक्रम हाती घेतला असून या उपक्रमाची सुरुवात ठाणगाव (ता.सुरगाणा) येथून सुरगाणा पंचायत समितीच्या सभापती मनीषा महाले यांची कन्या समीक्षा योगेश महाले हिच्या हस्ते लिंबू, चिकू, सीताफळ, आंबा, काजू, पेरू, बोर आशा फळरहित जातीच्या ११ वृक्षांची मुलीच्या हस्ते लागवड करत करण्यात आली आहे.


यावेळी बोलताना पंचायत समितीच्या सभापती मनिषा महाले म्हणाले, निसर्गाच्या समतोलपणासाठी सर्वांनी हिरारीने सहभाग नोंदवावा; पंचायत समितीच्या माध्यमातून आम्ही वृक्षसंवर्धन तसेच संगोपनासाठी उपाययोजना करीत आहोत. जलपरिषद मित्र परिवाराच्या या सुत्य उपक्रम प्रेरणादायी असून तालुक्यात वृक्ष वाढीसाठी भर घालणारा आहे.सर्वांनीच या उपक्रमात सहभागी होत मुलींच्या नावे वृक्ष लागवड करावी.

यावेळी यमुना महाले, योगेश महाले, रतन चौधरी, हिरामण चौधरी, नामदेव पाडवी, देविदास कामडी, जेष्ठ पत्रकार नितीन गांगुर्डे, नवनाथ गांगुर्डे, मनीषा घांगळे, अनिल बोरसे, पोपट महाले, गणेश सात पुते, हुशार हिरकुड, प्रकाश पवार, केशव पवार, अशोक तांदळे, संजय पढेर आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा