Breaking
बाकी कोणतेच पॅटर्न माझ्या तालुक्याला तिसऱ्या लाटे पासून वाचवू शकत नाही- माजी सभापती मंदाकिनी भोये


एकच पॅटर्न सुरगाणा तालुक्यात शतप्रतिषत लसीकरण !


सुरगाणा / दौलत चौधरी : माझा तालुका माझी जबाबदारी हे मिशन हाती घेतले त्यावेळी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भयंकर रूप धारण केलेले होते. सरकारी दवाखाने कोरोना पेशंटने भरून गेलेले होते. तालुक्यातील अनेक गावांमध्ये ग्रामस्थ कोरोनाने पीडित झालेले होते. सरकारी दवाखान्यात गेले की कोरोनाच काढतात, एकदा कोरोना काढला की, तो दवाखान्यातून जिवंत परत घरीच येत नाही. डॉक्टर त्याच्या किडन्या काढतात. या कारणाने ते दवाखान्यात गेले नाही आणि घरीच मरणे पसंत केले. मरायची वेळ आली तरी ते व त्यांचे कुटूंबीय कोरोना झाला हे मान्य करायला तयार नव्हते. आणि या अज्ञानामुळे तालुक्यात जवळपास १००० ते १५०० लोकांना नाहक जीव गमवावा लागला. लसीकरण करणे सोडाच परंतु माझे आदिवासी बांधव दवाखान्यात जायला सुद्धा तयार नव्हते. ऱ्यपिड अँटीजन टेस्ट करायला तयार नव्हते.

कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्यायला तयार नव्हते कारण लस घेतली की माणूस मारतो अशी त्यांची धारणा होती. अश्या परिस्थितीत शांत बसने म्हणजे त्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलण्यासारखे होते. त्याच वेळी तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची भीती ही वेक्त केलेली होती. जे नुकसान दुसऱ्या लाटेत झाले ते जर तिसऱ्या लाटेत होऊ द्यायचे नसेल तर माझ्यापुढे एकच पर्याय होता. माझ्या बांधवांना लसीकरणासाठी प्रेरित करणे आणि काहीही करून त्यांना लसीकरण करायला भाग पाडणे. हे काम जर यशस्वी करायचे म्हंटले तर मला लोकांमध्ये जाण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय दिसत नव्हता.अर्थात लोकांमध्ये जाणे हे काम त्यावेळी अतिशय कठीण आणि जीवघेणे होते कारण सर्वत्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते. आणि अश्या वेळी लोकांमध्ये जाणे म्हणजे कोरोनाच्या दाढेत हात घालन्या सारखे होते.

लढाई दोन फ्रंटवर लढायची होती. एक कोरोनाशी तर दुसरी लोकांमध्ये असलेल्या अज्ञानाशी. त्यावेळी भोये यांनी निर्णय घेतला आता शांत बसून जमणार नाही. समाज्याचें आपल्यावर असलेले ऋण फेडण्याची हीच ती वेळ आहे. समाजासाठी असे काम करण्याची संधी शतकातून एकदा कोणाला तरी मिळते आज ती संधी मला मिळाली आहे. असे समजून मी कामाला लागले. मी ठरवले माझ्या जीवाचे काहीही झाले तरी चालेल परंतु हे शिवधनुष्य मला आता पेलवावेच लागेल.

ज्यावेळी मी जनजागृती अभियानाची सुरुवात केली, त्यावेळी नाशिक जिल्ह्याची लसीकरणाची टक्केवारी १५% च्या आसपास होती तर माझ्या तालुक्याची १% च्या आसपास होती. मात्र आज मी अभिमानाने सांगू इच्छिते की, माझ्या तालुक्याची ही लसीकरणाची टक्केवारी १५% च्या आसपास आहे. त्यावेळी तालुक्यामध्ये ९ लसीकरण केंद्र चालू होते परंतु ते सर्व मिळून दिवसाला १०० नागरिक सुद्धा लसीकरण करायला तयार नव्हते. काही केंद्रांवर दिवसाला १० नागरिक सुद्धा लसीकरनाला येत नव्हते. तर काही लसीकरण केंद्रावर आठवडा आठवडा लोकांनी फिरकून सुद्धा पाहिले नाही अशी परिस्थिती त्यावेळी माझ्या तालुक्यात होती. राज्यात सर्वत्र लसीचा तुटवडा जाणवत होता तर माझ्या तालुक्यात लस घेणाऱ्यांचा तुटवडा जाणवत होता. त्यामुळे आज पर्यंत तालुक्यात खऱ्या अर्थाने लसीचा कधी तुटवडा जाणवलाच नाही. परंतु आज परिस्थिती बदलली आहे. 


आज बऱ्याच केंद्रांवर लस संपल्याने ग्रामस्थांना परत जावे लागत आहे. अजूनही माझी जबाबदारी संपलेली नाही. अजूनही तालुक्यात अशी काही गावे आहेत तेथे लोक लसीकरण करायला तयार नाहीत. तिथपर्यन्त माझी जनजागृती पोहचलेली नाही. अशी जी गावे आहेत त्या गावांमध्ये ही मी लवकरच जाऊन जनजागृती करणार आहे. आणि मला खात्री आहे ते ही लसीकरणासाठी पुढे येतील. जो पर्यंत माझ्या तालुक्यातील शेवटचा माणूस लस घेत नाही तो पर्यंत मी शांत बसणार नाही आणि त्यांनाही शांत बसू देणार नाही. आज माझ्या तालुक्यात सुद्धा लसीचा तुटवडा जाणवायला लागला आहे. ग्रामस्थ आज दररोज कुठे लसीकरण कॅम्प आहे त्याची विचारणा माझ्याकडे फोनवर करत आहेत.
 
गेले ४ महिन्यांपासून मी सुरगाणा तालुक्यातील १०० च्या आसपास गावांना लसीकरण जनजागृती करण्यासाठी भेटी दिल्या. लोकांना घराघरात जाऊन एकत्र केले. रात्री १०/११ वाजे पर्यंत त्यांच्याशी संवाद साधला. बऱ्याच ठिकाणी लसीकरण कॅम्प नसतांना डॉक्टरांना सांगून लसीकरण कॅम्पचे आयोजन केले. काही गावांमध्ये सुरुवातीला ग्रामस्थांना लसीकरण केंद्रापर्यंत जाण्यासाठी भाड्याची गाडी करून दिली. ज्या गावात एकही माणूस कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्यायला तयार नव्हता तेथे जनजागृती केल्यानंतर एकाच आठवड्यात २५० ते ३०० ग्रामस्थांनी लसीकरण केले. ज्या गावात तपासणी करणारे पथक आले तर ग्रामस्थ गाव सोडून डोंगराला पळून जात होते त्याच ग्रामस्थानां लसीकरणाला प्रवृत्त केले. आज पर्यंत मी गावागावांमध्ये जाऊन १० हजारच्या आसपास लोकांच्या भेटी घेतल्या, त्यांना लसीकरणाचे महत्व पटवून दिले. माझ्या बोलण्यावर व माझ्यावर विश्वास ठेवून हजारो ग्रामस्थांनी लस घेतली. शेकडो लोकांना तर मी फोनवर लसीकरणाचे महत्व पटवून दिले.

माजी सभापती मंदाकिनी भोये म्हणतात, "बांधवांनो हे काम करत असतांना मला अनेक अडचणी व अनेक चांगले व वाईट अनुभव आले. कोणी शिव्या घातल्या कोणी राजकारण करत आहे असे आरोप केले. कोणी गावातून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. परंतु मी नडगमगता या सर्व गोष्टीना सामोरे गेले. काहींनी घरी येऊन तर काहींनी फोनवर कामाचे कौतुक केले. कळवण प्रांताधिकारी मिना तसेच API लोखंडे व पोलीस हवालदार मुंगसे यांनी झगडपाडा येथे घरी येऊन माझी भेट घेतली व मी करत असलेल्या लसीकरण जनजागृतीचे कौत्तुक केले. तर मंगलमैत्री वेल्फेअर फाउंडेशन, नाशिक यांनी कोरोना योद्धा 2021 विशेष आरोग्य सन्मान पुरस्कार सन्मानपत्र देऊन सन्मानित केले. या सर्वांची मी मनापासून आभारी आहे. तसेच तालुक्यातील लसीकरण टीमचे सर्व प्रमुख व त्यांचे सहकारी व गावागावांमध्ये मला सहकार्य करणारे अनेक नागरिक याचेही या कामात मोलाचे योगदान आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच मी हे काम करू शकले."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा