Breaking


पुन्हा एकदा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आंबेगाव तालुक्याच्या वतीने 4 वर्षाच्या चिमुकलीला मदतीचा हात !


मंचर : पुन्हा एकदा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आंबेगाव तालुक्याचा वतीने 4 वर्षाची चिमुकली पाखी सतीश गावडे हिला मदतीचा हात दिला आहे. तिच्या दोन्ही हातांची बोटे एकमेकांना चिकटलेली होती त्यावर यशस्वी ( Hand Plactic Surgery ) शस्त्रक्रिया  करण्यात आली.


महाराष्ट्र राज्याचे नगरविकास / बांधकाम मंत्री एकनाथजी शिंदे व माजी खासदार शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व वंदनीय बाळासाहेब ठाकरे व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे फाउंडेशन तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे व राजभाऊ भिलारे ( शहरप्रमुख पुणे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ) व खेड तालुका शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष समन्वयक तुषार सांडभोर व  देविदासजी आढळराव पाटील ( शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आंबेगाव समन्वयक ) यांच्या सूचनेनुसार ही मदत करण्यात आली आहे.

पाखी सतीश गावडे वय 4 वर्ष या चिमुकलीचा दोन्ही हाताची बोटे चिकटलेली होती, त्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. तेव्हा तिचा वडिलांनी ही गोष्ट शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मंचर शहर समन्वयक आकाश मोरडे यांच्या कानावर घातली व आकाश यांनी लगेच ही गोष्ट शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष खेड तालुका समन्वयक तुषार सांडभोर व   शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आंबेगाव तालुका समन्वयक देविदास आढळराव पाटील यांच्या कानांवर घातली. त्यांनी लगेच या गोष्टीचा पाठपुरावा करून तुषार सांडभोर यांनी  डी. वाय. पाटील हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होण्यास सांगितले. 

तब्बल 16 दिवस पेशंट चिमुकली पाखी गावडे त्या हॉस्पिटलमध्ये  ऍडमिट होती तिच्या प्रथम सर्व प्रकारच्या टेस्ट करण्यात आल्या, त्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तब्बल 4 तास शस्त्रक्रिया चालू होती व ती शस्त्रक्रिया यशस्वी झाली.

तिचा वडिलांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे व तुषार सांडभोर व देविदास आढळराव पाटील यांचे आभार मानले. याकामी आकाश मोरडे व सागर लोखंडे यांचे सहकार्य लाभले. यापुढेही मोफत शस्त्रक्रिया करण्याचे काम शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष करील, असू कक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा