Breaking

ब्रेकिंग : पंकजा मुंडे दिल्लीला रवाना, जे. पी. नड्डा यांची घेणार भेट ? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण !मुंबई : नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. त्यामध्ये ४३ नेत्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात प्रीतम मुंडे यांना डावलण्यात येत असल्याचे आरोप करण्यात येत होते. यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत नाराज नसल्याचा खुलासा केला होता. मात्र आज पंकजा मुंडे या अचानक दिल्लीला रवाना झाल्या आहेत.


बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद न मिळाल्याने भाजपमधील मुंडे समर्थकांनी राजीनामे द्यायला सुरुवात केली आहे. बीडमधील जवळजवळ २० पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असून त्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा समावेश आहे. या राजीनामा सत्राच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे अचानक दिल्लीला रवाना झाल्या आहेत. दिल्लीमध्ये पंकजा मुंडे पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. 


दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांचा समावेश होईल अशी सर्वत्र चर्चा होती. मात्र या सर्व चर्चांना पूर्णविराम देत केंद्रीय मंत्रिमंडळात डॉक्टर भागवत कराड यांना स्थान देण्यात आले. यामुळे मुंडेना संपवण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तृळात सुरू झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा