Breaking
पेठ : शिहरीपाडा या गावाला जोडणारा रस्ता पावसाने गेला वाहून


पेठ : गेल्या तीन चार दिवसांपासून राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस सुरू आहे, या जोरदार पावसामुळे पेठ तालुक्यातील शिहरीपाडा या गावाला जोडणारा रस्ता वाहून गेला आहे. 


शिहरीपाडा या गावातील रस्त्याची पहिल्यापासूनच दुरवस्था होती, त्यामुळे नेहमी दळणवळणाचा प्रश्न समोर येत होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन गावकऱ्यांनी लोकवर्गणी काढून तसेच सर्व गावाच्या लोकसहभागातून रस्ता दुरुस्त केला होता. मात्र जोरदार पावसाने हा रस्ता वाहून गेल्याने दळणवळणाची सोय बंद झाली आहे. 


तसेच, गावकऱ्यांचे कष्ट वाया गेले असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. हा रस्ता वाहून गेल्याने या परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासनाने यावर तोडगा काढावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा