Breakingजेष्ठ कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल, महाराजांच्या अडचणी वाढल्या !


मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील रहिवाशी कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. इंदोरीकर महाराज यांनी हिंदू धर्म ग्रंथांचा दाखला देत "पुत्र प्राप्तीबाबत एक वक्तव्य केले होते. मात्र हेच व्यक्तव्य वादग्रस्त ठरले होते. यावरून अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने संगमनेर दिवाणी न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या विरोधात निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी संगमनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाने इंदोरीकर महाराजांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली होती. मात्र याला आव्हान देत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने "आमची लढाई कोणा व्यक्ती विरोधात नसून प्रवृत्तीच्या विरोधात आहे"असे म्हणून या निर्णयाला आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे इंदोरीकर महाराज यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, इंदोरीकर महाराज यांनी यांनी एका कार्यक्रमात "स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो. विषम तिथीला संग झाला तर मुलगी होते. आणि स्त्री संग अशावेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते" असं वादग्रस्त वक्तव्य इंदोरीकर महाराजांनी केले होते.

"लिंग भेदभाव करणाऱ्या या वक्तव्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने निवृत्ती महाराज इंदोरीकर याना पीसीपीएनडिटी कायद्यान्वये नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले होते. यावर आरोग्य विभागाने महाराजांना कालावधीही दिला होता. मात्र अखेरच्या दिवशी महाराजांनी आपल्या वकिलामार्फत उत्तर देऊन खुलासा केला होता.

या खटल्यातील एक महत्वाची बाब म्हणजे निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी "वादग्रस्त वक्तव्य"कोठे आणि कधी केले याचा सबळ पुरावा फिर्यादीकडे किंवा तक्रारदाराकडे नव्हता. त्यांचे कीर्तन समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर त्यांचेवर टीकेची झोड उठविण्यात आली होती. काही सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस)इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा,अशी मागणी केली होती.

इंदोरीकर महाराज यांनी हे वक्तव्य कधी आणि कोठे केले, या बाबतचा कोणताही पुरावा तक्रारदारांनी न्यायालयाला दिला नाही. याबाबतचा कोणताही पुरावा तक्रारदारांकडे नसल्याचं कारण देत मार्च महिन्यात अहमदनगर जिल्हा प्रशासनाने गुन्हा दाखल केला नव्हता. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे यांनी बाबत पाठपुरावा करून या प्रकरणाचे पुरावे जिल्हा आरोग्य विभागाला दिले. त्या नंतर शुक्रवार दि.२६ जून २०२० रोजी संगमनेर सत्र न्यायालयात जिल्हा आरोग्य प्रशासनाने इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. संगमनेर न्यायालयाने इंदोरीकर महाराजांना समन्स बजावून न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला होता. त्याप्रमाणे इंदोरीकर महाराज न्यायालयात हजर झाले होते. त्यांना तेथे दिलासा मिळाला होता. मात्र आता अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि सरकारी पक्षाकडून उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. 

उच्च न्यायालयात अंधश्रध्दा समिती आणि जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने नव्याने याचिका दाखल करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा