Breakingफुलबाश धांडे यांची बिरसा फायटर्स अमरावती जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड


अमरावती : फुलबाश धांडे यांची बिरसा फायटर्स संघटनेच्या अमरावती जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा  यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 21 जुलै रोजी ऑनलाईन सभा घेण्यात आली. 


या सभेत राज्य पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून बिरसा फायटर्स चे संस्थापक  सुशीलकुमार पावरा यांनी फुलबाशभ धांडे  यांची अमरावती जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड केल्याचे घोषित केले. तत्पूर्वी फुलबाश धांडे यांनी बिरसा फायटर्स  संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. असे राज्य उपाध्यक्ष राजेश धुर्वे यांनी सुशीलकुमार पावरा संस्थापक बिरसा फायटर्स यांना कळवले. त्यावरून त्यांची समाजाबद्धल काम करण्याची तळमळ लक्षात घेऊन त्यांना अमरावती  जिल्ह्यात कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी आपण काम करणार असल्याचे यावेळी नवनियुक्त अमरावती  जिल्हा कार्याध्यक्ष फुलबाश धांडे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा