Breaking
पिंपरी चिंचवड : तुकाराम तनपुरे फौंडेशनच्या वतीने डॉक्टर्सचा सन्मानपिंपरी चिंचवड : "राष्ट्रीय डाॅक्टर्स डे" निमित्ताने पिंपरी-चिंचवड परीसरातील कोरोना काळात रुग्णांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या, दिवस-रात्र एक करून आपल्या जीवाची पर्वा न करता सामाजिक बांधिलकी म्हणुन कार्य करणाऱ्या तसेच लसीकरण मोहीमेत मोलाचे योगदान देणाऱ्या डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून कै तुकाराम तनपुरे फाऊंडेशन पोलिस व नागरिक मित्र संघटना यांच्या वतीने डॉक्टर्स आरोग्य विभागाचे कर्मचारी यांना सन्मानित करण्यात आले.


संघटनेच्या वतीने घरकुल हॉस्पिटल, धनश्री हॉस्पिटल, गुंजकर हॉस्पिटल, करमरकर हॉस्पिटल, डॉ. नीलेश मुथीयन, डॉ.सिद्धपूर, मयूर हॉस्पिटल डॉ.भळगट, डॉ.गुंजकर, डॉ.वल्लभ पाटील, डॉ.अधिकारी वेदांत हॉस्पिटल डॉ. पाटील व डॉ.विजय घोडके याना सन्मानित करण्यात आले. या कार्यात संघटनेच्या वतीने मेजर रघुनाथ सावंत, वासुदेव काळसेकर, विजय कुमार अप्पड, तांदळे मॅडम, घरकुल अपंग संस्था काळभोर, नितिन मोरे, विशाल काळे, अशोक तनपुरे यांनी सहभाग घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा