Breakingपिंपरी चिंचवड : मोरया गोसावी मंदिर पाण्याखाली; पवनामाईला पूर


पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने, मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग पवना नदी पात्रात करण्यात येत आहे. त्यामुळे पवना नदी पात्रता पाण्याची पातळी वाढली असून चिंचवडचे ग्रामदैवत असणाऱ्या मोरया गोसावी गणपती मंदिर पाण्याखाली गेले आहे.


सध्या पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. गेल्या दोन दिवसातील संततधार पावसामुळे औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवडचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीची पाणी पातळी वाढली आहे.


पवना नदी तीरावरील मोरया गोसावी मंदिर आवारात पाणी शिरले आहे. पवना धरणातील पाणीसाठ्यात ९.९९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठा ५५.०७ टक्के झाला आहे. पवनानदीला पूर आला आहे.पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ परिसरात संततधार सुरू आहे. त्यामुळे धरणांची पाणी पातळी वाढली आहे. पवना नदीवरील थेरगाव येथील केजूदेवी मंदिर आणि चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिराच्या आवारात पाणी आले आहे. तसेच जिजाऊ उद्यानाच्या काही भागात पाणी शिरले आहे. शहर परिसरातील नाल्यांमधूनही पाणी वाढले आहे. शहरातील उपनगरात रस्यांची कामे सुरू असल्याने रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.


पवना नदीतीरी असणाऱ्या पिंपरीतील काळेवाडी पुलालगतच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच बोपोडीतून औंध रस्त्यांकडे जाणाऱ्या पुलाखाली पाणी शिरले आहे. त्यामुळे रस्ता बंद करण्यात आला आहे. तसेच पावसामुळे शहरातील काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण झाला होता. तर चिंचवड परिसरातील वीज काही काळ गायब झाली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा