Breaking


पिंपरी चिंचवड : अपना वतन संघटनेच्या वतीने पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात पेढे वाटून गांधीगिरी


पिंपरी चिंचवड : देशामध्ये पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस यांच्या दरामध्ये भरमसाठ वाढ होत आहे. पेट्रोल डिझेल च्या दराने तर शतक पार केले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल दरवाढ करून पेट्रोल डिझेलला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त करून दिले आहे. तसेच आतापर्यंत कोणत्याही सरकारला शक्य झाले ते इंधन दरवाढ करून भाजप सरकारने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. त्यामुळे नागरिकांना गांधीगिरी पद्धतीने पेढे वाटून केंद्रसरकारचे उपहासात्मक अभिनंदन केले.


यावेळी अपना वतन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रिक्षावाले, सिग्नल वरील नागरिक, पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेलेले नागरिक, गॅस सिलिंडर आणण्यासाठी गेलेलं नागरिक, भाजीविक्रेते याना पेढे वाटून पेट्रोल डिझेल दरवाढीचा गांधीगिरी पद्धतीने निषेध केला.
 
या माध्यमातून पेट्रोल डिझेल दरवाढीची तीव्रता, इंधन दरवाढीमुळे सामान्य जनतेवर होणारे आर्थिक दुष्परिणाम याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी अनेक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. त्यांच्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून सरकारविरोधातील असंतोष प्रदर्शित होत होता. यावेळी नागरिकांनी केंद्र व राज्य सरकारला इंधन दरवाढ व घरगुती गॅस दरवाढ माघे घेण्याची विनंती केली. 


कार्यक्रमाच्या समारोपावेळी संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी सांगितले कि, कोरोनामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. तसेच सर्वसामान्य जनता त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक व घरातील वैद्यकीय खर्चाची सांगड घालताना व्याकुळ झाली आहे. घरखर्च चालवताना नाकीनऊ येत आहेत . अशा परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारने आपापल्या अखत्यारीत असलेले टॅक्सेस कमी करून इंधन दर कमी करावेत व सर्वसामान्यना दिलासा द्यावा अशी मागणी सरकारकडे केली

यावेळी अपना वतन संघटनेचे पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष हमीद शेख, संघटनेच्या महिला शहराध्यक्ष राजश्री शिरवळकर, संघटक निर्मला डांगे, रियाज शेख व अन्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा