Breakingपिंपरी : कष्टकरी कामगारांच्या हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेस खंबीरपणे साथ देईल - जयंत पाटील


पिंपरी दि.२३ : पिंपरी चिंचवड कामगार नगरी आहे, येथील कष्टकरी कामगारांना कष्टकरी संघर्ष महासंघाने एकसंघ  करून त्यांना न्याय हक्क मिळवून देत आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पाठीशी राहून कामगारांना न्याय देण्याची भूमिका घेऊ आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसने नेत्रदीपक विकास केला असून अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी पुन्हा यश संपादन करेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.


राष्ट्रवादी कॉंग्रेस, कष्टकरी संघर्ष महासंघ व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आज रोटरी क्लब थरमॅक्स चौक चिंचवड येथे कष्टकरी कामगार संवाद हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

यावेळी महाराष्ट्राचे महागायक आनंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, कामगार नेते काशिनाथ नखाते, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे,  विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ, बहुजन सम्राट सेनेचे संतोष निसर्गंध, जेष्ठ नेते काका खंबालकर, नगरसेविका मंगला कदम, माजी नगरसेवक जगदीश शेट्टी, साकी गायकवाड , कविता खराडे, हरीश मोरे, अशोक मगर,  आदीसह पुणे जिल्ह्यातिल कष्टकरी कामगार  उपस्थित होते.

जयंत पाटील पुढे म्हणाले की पिंपरी चिंचवड शहराने पूर परिस्थितीमध्ये सांगलीला खूप मोठी मदत केलेली आहे, आता सुद्धा पुर  पूरस्थिती आहे त्यांचे योग्य नियोजन करण्यात येत आहे. राष्ट्रवादी हा कार्यकर्त्याला न्याय देणारा पक्ष आहे त्यामुळे पक्षात कार्यकर्त्याला योग्य पद्धतीने संधी दिली जाते येणा-या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भरगोस  यश संपादन करेल. कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी कष्टकरी कामगारांची सध्याची स्थिती व त्यांच्यासाठी विविध योजनेतिल सुधारणा बाबत माहिती दिली, कोरोणा कालावधीत जो गंभीर परिणाम श्रमिक, कष्टकरी, कामगारावर झाला आहे. तो दूर करून त्यांना अर्थसाह्य देण्याबाबत भूमिका घ्यावी आणि त्यांना म्हातारपणी पेन्शन योजना लागू करणे बाबत मा कामगार मंत्री हसन मुश्रीफ़ यांचेकडे तातडीने बैठकीची यावेळी मागणी केली.   कष्टकरी संघर्ष महासंघाच्या तर्फे चार घास सुखाचे अन्न वितरण एकुण एक लाख सत्तरहजार पेक्षा अधिक  लोकाना लाभ झाला आहे याची आवर्जून माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कौतुक केले. 

त्याचबरोबर कष्टकरी संघर्ष महासंघाच्या कार्यालयाला भेट देऊन सविस्तर माहिती घेतली आणि कामकाजाबद्दल आपुलकीने त्यांनी चर्चा केली. याप्रसंगी रिक्षाचालक, फेरीवाला, बांधकाम कामगार, घरेलू कामगार यानां सुमारे एक कोटी रुपयांच्या लाभाच्या वितरणाची सुरुवात करण्यात आली आणी  कामगारनां विविध लाभाचे वितरण जयंत पाटील यांचे हस्ते करण्यात आले. 

कोरोना कालावधीत विशेष सहकार्य करणाऱ्या नर्स डॉक्टर पोलीस नागरिक मित्र यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धनाथ देशमुख, अनिल बारवकर, युवराज निलवर्ण, उमेश डोरले, महादू गायकवाड, चंद्रकांत कुंभार, 
सुखदेव कांबळे, माधुरी जलमूलवार, राणी माने, अर्चना कांबळे, वृषाली पाटणे, इरफान चौधरी, ओमप्रकाश मोरया, शंकर  साळुंखे, राजू बिराजदार, राजेश माने,  सैफुलशेख, सलीम डांगे, निरंजन  लोखंडे आदिनी परिश्रम घेतले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा