Breakingपिंपरी : घोलप महाविद्यालयामध्ये ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्नपिंपरी : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सांगवी येथील बाबुराव घोलप महाविद्यालयातर्फे वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 


महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी सकाळ सत्र प्रमुख डॉ.वंदना पिंपळे, समन्वयक प्रा. जितेंद्र वडशिंगकर, प्रा.प्रकाश पांगारे आदी मान्यवर उपस्थित होते.


स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना प्राचार्य डाॅ. नितीन घोरपडे म्हणाले की, एखाद्या जवळ प्रचंड ज्ञान असते परंतु ते ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक शब्दशक्ती नसते. त्यामुळे अशा प्रकारच्या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांची वक्तृत्वशैली प्रगल्भ होऊन भावी आयुष्यामध्ये त्याचा मोठा फायदा विद्यार्थ्यांना होईल, असे मत व्यक्त केले. 


यावेळी महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रमांच्या सुमारे २८ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये द्वितीय वर्ष बीएस्सीच्या हर्षदा जाधव हिने प्रथम क्रमांक पटकाविला तर किर्ती गव्हाणे (प्रथम वर्ष बीए) व पिंकी चौधरी (द्वितीय वर्ष बीएस्सी) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला.


या स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रा. जितेंद्र वडशिंगकर तर आभार प्रदर्शन प्रा. प्रकाश पांगारे यांनी केले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रा. अनंत पवार, डॉ.चंदा हासे, डॉ. अर्जुन डोके, डॉ.माया माईणकर, प्रा. सुवर्णा खोडदे यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा