Breaking


पिंपरी : गरीबांची चूल बंद करताय, गँसवरील अनुदान वाढवा - माकप



घरगुती सिलिंडरची किंमत कमी करण्याची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी


पिंपरी, दि. ८ : सरकारने गेल्या आर्थिक वर्षात लाखो कोटी रुपयांचे कर इंधन आणि घरगुती गॅसच्या किमती वाढवून गोळा केले आहेत. मोदी सरकार कोणत्या प्रकारचे अच्छे दिन आणत आहे ? सरकार स्वतःच्या खिशातून काहीच देत नाही. कार्पोरेट उद्योगांना सवलती आणि कर्ज माफी दिली जात आहे. आणि कोट्यवधी बेरोजगार गोरगरिबांच्या खिशातून त्यांची तुटपुंजी कमाई हिरावून घेत आहे, असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर सचिव गणेश दराडे म्हणाले.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे मापच्या च्या वतीने मोदी सरकारच्या महागाई च्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. त्यावेळी दराडे बोलत होते.


दराडे म्हणाले की, जुलै 2020 मध्ये घरगुती सिलिंडरची किंमत 637 रुपये होती. संपूर्ण वर्षात सरकारने इंधन दरवाढ करून जनतेला मेटाकुटीस आणले आहे. सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेल बरोबर घरगुती गॅस च्या किमती 35 टक्यांनी वाढवल्या आहेत. आज गॅस सिलिंडर 835 रुपये दर आहे. कोरोना काळात दरवाढ करून सरकारने सबसिडी बंंद केली आहे.


रोजगार बुडाला आहे. रोजंदारी कामगार, घरेलू कामगार, रिक्षा चालक,बिगारी कुटुंबाना आर्थिक दिलासा न देता केंद्र सरकारने महागाईचे भूत स्वयंपाक घरात आणून सोडले आहे. एका वर्षात 200 रुची  सिलिंडरची दरवाढ करून सामान्य कुटुंबाची सरकारने चूल बंद केली आहे, असा आरोप माकपच्या महिला नेत्या अपर्णा दराडे यांनी केला.



केंद्रसरकरने एक वर्षात 3 लाख कोटी रुपयांची कमाई इंधन आणि गॅस दरवाढीतून केली आहे. जनता संतप्त आहे. महिला गृहिणी त्रस्त आहेत, याचा विचार केंद्र सरकारने करावा, असेही अपर्णा दराडे म्हणाल्या.


घरगुती गॅस सिलिंडर जुलै 2020 च्या किमतीवर स्थिर करा, अथवा 250 रुपये अनुदान द्या. रेशनवर तेल, साखर, डाळी सहित अन्नसुरक्षा कायद्या अंतर्गत 13 वस्तूचे रास्त दारात वितरण करा. पेट्रोल डिझेल वरील अबकारी कर 27 टक्क्यांनी कमी करा. कार्पोरेट टॅक्स वाढवा, सरकारी दौरे, प्रशासकीय खर्च कमी करा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.


यावेळी सतीश नायर, क्रांतिकुमार कडुलकर, सचिन देसाई, अमिन शेख, बाळासाहेब घस्ते, प्रकाश शिवेकर, दिलीप पेटकर, स्वप्निल जेवळे, शेहनाज शेख, सतीश शिंदे, वीरभद्र स्वामी, अनिता शेरकर, ज्योती मुलमुले, रिया सागवेकर, संगीता देवळे, योगिता कांबळे, हरीकुमार, अब्राहम, निकिता कनना, शांता इसरन, अफसना शेख, जॉर्ज वर्गीस, रेखा सोनवणे, दामोदरन, नागमा कन्न, आशा बर्डे, मंगल डोळस, वंदना शिवशरण, यल्लमा कोलगवी, रेश्मा शेख, राजिया शेख, लक्ष्मी अवलोळ, लक्ष्मी जगले, प्रगती डिंगोळे, उमा मधुरे, कविता व्यास, कोमल गवंडी, सुनीता कुरळेकर, वैशाली  लोकरे, सुनीता कनोजिया, जीनू कनोजिया, धनश्री कनोजिया, सरिता सूर्यवंशी, अनुसया राठोड यांच्यासह महिला, युवक, रिक्षा व्यवसायिक निदर्शनात सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा