Breaking
राजकीयदृष्ट्या मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी च्या विरोधात आहे, पहा नक्की मुख्यमंत्री काय म्हणाले?मुंबई : राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांची महाविकास आघाडी सत्तेत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण ढवळलं दिसून येत आहे. त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर एकच खळबळ उडाली. 


अशातच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी एक मोठं विधान केलं आहे. राजकीयदृष्ट्या मी मित्रपक्ष कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधात असल्याचं मोठं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

 


मुख्यमंत्री म्हणालेत, 'राजकीयदृष्ट्या मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याविरोधात आहे. मात्र त्याचा असा अर्थ असा नाही की मी त्यांनी सरकारमध्ये केलेल्या चांगल्या कामांची निंदा करेन, नाही. ते चुकीचं ठरेल. मी आणि बाळासाहेबांनी असा कधीच विचार केला नाही. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा