Breaking


पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या वतीने दिघी विकास मंचाच्या कार्याचा गौरव ..!


पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या वतीने दिघी विकास मंचाच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला आहे.


दिघी विकास मंचाने सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रिडा व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उपक्रम राबवून सामान्य नागरिकांच्या हितासाठी केलेल्या कार्याबद्दल पिंपरी - चिंचवड महानगपालिका, पिंपरीच्या वतीने "सामाजिक कार्याचा गौरव" पुरस्कार महापौर उषा ढोरे, उपमहापौर हिराबाई घुले यांच्या शुभ हास्ते प्रदान करण्यात आला.

या वेळी शिक्षण सभापती चेतन घुले, दिघी विकास मंचाचे अध्यक्ष हरिभाऊ लबडे , सुनिल काकडे, के. के. जगताप, विकी अकुलवार, समाधान कांबळे, दत्ता घुले, अभिमन्यु दोरकर, ज्ञानेश आल्हाट, पांडूरंग मेहत्रे व अन्य सभासद उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा