Breaking
प्रा.डाॅ. सुभाष कदम यांची न्याय मिळण्यासाठी राष्ट्रपतींकडे धावरायगड : 'समान काम समान वेतन' कायद्यान्वये सहाय्यक प्राध्यापकाच्या वेतनश्रेणी नुसार मलाही वेतन अदा करण्याचे निर्देश राज्य सरकारला देण्याची मागणी डॉ. सुभाष कदम या प्राध्यापकाने राष्ट्रपतींकडे केली आहे.


प्रा. डाॅ. सुभाष रामराव कदम हे सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वरिष्ठ महाविद्यालय महाड - रायगड येथे अर्थशास्त्र सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत असून त्यांनी "समान काम समान वेतन "(Equal Work Equal Pay) कायद्यान्वये वरिष्ठ महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकाच्या वेतनश्रेणी नुसार वेतन अदा करण्यासाठी मुंबई  विद्यापीठ व महाराष्ट्र शासनाकडे वेळोवेळी विनंती अर्ज, स्मरणपञे, बेमुदत धरणे आंदोलन, बेमुदत अन्नत्याग आंदोलन, आत्मदहनाचा प्रयत्न, रास्ता रोको आंदोलन इत्यादी लोकशाही मार्गाने न्याय मागितला आहे, परंतु मुंबई विद्यापीठ व महाराष्ट्र शासन त्यांना न्याय देण्यास असमर्थ ठरल्यामुळे त्यांनी न्याय मिळण्यासाठी राष्ट्रपतींकडे धाव घेतली आहे.


तसेच, राष्ट्रपतींनीही त्यांना न्याय देण्यास विलंब केल्यास ते राष्ट्रपतींकडे कुटुंबासह इच्छा मरणाची परवानगी मागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा