Breaking
प्राध्यापक भरती लक्ष्यार्थ आंदोलनास बिरसा फायटर्सचा जाहीर पाठिंबा


रत्नागिरी : प्राध्यापक भरती लक्ष्यार्थ आंदोलन महाराष्ट्र राज्य आयोजित  महाराष्ट्रातील अनुदानित महाविद्यालये आणि विद्यापीठातील 100% प्राध्यापक पदभरती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यासंदर्भात दि. 19 जुलै, 2021 पासून प्रस्तावित असलेल्या पुणे, नागपूर सह राज्यव्यापी आंदोलनास बिरसा फायटर्स संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी राज्य समन्वयक प्राध्यापक भरती लक्ष्यार्थ  आंदोलन महाराष्ट्र राज्य यांना दिनांक 10 जुलै 2021 रोजीच्या दिलेल्या  पत्राद्वारे हा पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान सुशीलकुमार पावरा संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांना राज्य समन्वयक प्राध्यापक भरती लक्ष्यार्थ आंदोलन महाराष्ट्र राज्य यांचे दिनांक 7 जुलै 2021 रोजी आंदोलनास पाठिंबा मिळावा म्हणून पत्र आले होते.त्यावर बिरसा फायटर्स संघटनेने लगेच निर्णय घेऊन आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला आहे. 


पत्रात म्हटले आहे की,आपल्या संघटनेच्या वतीने मिळालेल्या पत्रास अनुसरून दिनांक 19 जुलै, 2021 पासून खालील मागण्यांच्या अनुषंगाने आपल्या संघटनेकडून पुणे, नागपूरसह राज्यव्यापी आंदोलन केले जाणार आहे. 

◆ आंदोलनाच्या मागण्या पुढीलप्रमाणे :

● अनुदानित महाविद्यालये आणि विद्यापीठातील सहायक प्राध्यापकांची रिक्त पदे 100 % तात्काळ भरण्यात यावीत.

● प्राध्यापक पदभरती प्रचलित विषयनिहाय व  विभागावर आरक्षण कायम ठेवावे.

● CHB पद्धत बंद करण्यासाठी प्रस्तावित असलेली डॉ. धनराज माने समितीची कार्यवाही तात्काळ सुरू करून निहित कालावधीत अहवाल सादर करावा.

● पूर्णवेळ प्राध्यापक पद भरल्यानंतर शिल्लक कार्यभारासाठी 'अर्धवेळ प्राध्यापक पदाची निर्मिती करण्यात यावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा