Breaking
पुणे : बिगर आदिवासी व्यक्तीच्या नावावर असणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी पेसा कायद्यानुसार आदिवासींच्या नावावर होणार !आंबेगाव : बिगर आदिवासी व्यक्तीच्या नावावर असणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी पेसा कायद्यानुसार आदिवासींच्या नावावर करण्याबाबत पंचायत समिती आंबेगाव यांनी सरपंच व ग्रामसेवक यांना काढले आहेत.


पत्रामध्ये म्हटले आहे की, पंचायत क्षेत्र विस्तार कायदा १९९६ ( पेसा ) केंद्रशासनाने पारीत केलेला आहे. सदर कायदा आंबेगाव विकास गटातील अनुसूचीत जमाती क्षेत्रातील गावांना लागु आहे. पेसा कायदयाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाने दिनांक ४ मार्च २०१४ रोजी पेसा नियम पारीत केले आहे. सदर पेसा नियमाच्या नियम २३, २४ आणि २५ नुसार अनुसूचीत जमाती क्षेत्रातील आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी बेकायदेशीररित्या बिगर आदिवासी व्यक्तीकडे हस्तांतरीत झालेल्या असतील तर पेसा ग्रामसभेच्या मार्फत सदरची जमिन आदिवासी बांधवांना परत करता येते. असे नमुद आहे. 


तसेच सदर प्रकरणाची दखल जिल्हाधिकारी हे स्वत : घेऊ शकतात. वरील संदर्भानुसार आंबेगाव विकास गटातील एकुण २५ आदिवासी कुटुंबांची वहिवाटीखाली असणारी जमिनीची यादी या कार्यालयास प्राप्त झाली आहे. या यादीनुसार बेकायदेशिररित्या हस्तांतरीत झालेल्या जमिनी पेसा नियम २३, २४ आणि २५ अन्वये जनजागृती करून हा विषय ग्रामसभेमधे ठेऊन विस्तृत चर्चा करुन सदर प्रकरणाची परिपुर्ण प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयास सादर करावयाचा आहे. त्यासाठी सदर प्रकरणाची जनजागृती करण्यासाठी गावामध्ये तात्काळ दवंडी द्यावी, नोटीस बोर्डवर माहिती, तसेच ग्रामपंचायत ठिकाणी फ्लेक्स लावण्यात यावा व ग्रामस्थाकडून अशा प्रकरणाची माहिती घेण्यात यावी, असेही म्हटले आहे.


तसेच या प्रकरणांबाबत पंचायत समितीचे सभापती संजय गवारी यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच, ग्रामसेवक, मंडल अधिकारी, तलाठी यांची आढावा बैठक १४ जुलै रोजी होणार असल्याचेही पत्रात नमूद केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा