Breakingपुणे : खेड सेझ १५ टक्के परताव्याचा प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवा - खा. अमोल कोल्हे


खेडखेड सेझ १५ टक्के परताव्याचा प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवा, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 


सविस्तर वृत्त असे की, खेड तालुक्यातील व शिरूर तालुक्यातील कनेरसर, निमगाव दावडी, केंदुर, गोसासी या गावांची १२५० हेक्टर जमीन सेझ प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती. जमीन संपादन करताना हेक्टरी १७ लाख ५० हजार एवढा मोबदला देण्यात आला होता. मोबदला देताना 25% रक्कम पंधरा टक्के परतावा विकसित प्लॉटच्या स्वरूपात देण्यासाठी विकसन मूल्य म्हणून कपात करण्यात आले होते.

त्यानंतर या कपात कपात रकमेचे शेअर्स मध्ये रूपांतर करून खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी स्थापन करण्यात आली. गेले १२ वर्षापेक्षा अधिक कालावधी होऊनही या कंपनीचे कामकाज फक्त कागदोपत्री असल्याने व शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीने विश्वासात घेतली जात नसल्याने ‌के. डी. एल. कंपनीच नको अशी शेतकऱ्यांनी भूमिका घेतली. शेतकऱ्यांनी याबाबत लेखी निवेदने राष्ट्रपती, राज्यपाल उद्योग मंत्री, मुख्यमंत्री, एमआयडीसी सी.ई.ओ., जिल्हाधिकारी यांना वारंवार दिली. 

डॉ. अमोल कोल्हे यांनी खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी कडे असलेला भूखंड एमआयडीसी कडे देऊन शेतकऱ्यांना १५ टक्के परतावा करण्याची मागणी केली आहे. तसेच गरज भासल्यास शेतकरी प्रतिनिधी, स्थानिक आमदार व के. आय. पी. एल. कंपनीसह सर्व प्रतिनिधींंची बैठक लावून तातडीने प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा