Breaking
आदिवासी भागात पावसाची हुलकावणी, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने केली पाहणी


जुन्नर (पुणे ) : तालुक्यात गेल्या १० दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. अशा परिस्थितीत आदिवासी भागात भाताची रोपे जळून जायला लागली आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांनी कृषी आधिकारी फडतरे यांना घेऊन आदिवासी भागातील भाताच्या वावरात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.


अजून तीन चार दिवस पाऊस पडला नाही तर रोपे जळुन जातील व परिस्थिती फार भयानक होईल. कारण या भागात भात पीक हेच प्रमुख पीक आहे. त्यामुळे ३- ४ दिवसात पाऊस नाही झाला तर पंचनामे करून शेतक-यांना नुकसान भरपाई मिळावी, अशीही मागणी करणार असल्याचे लांडे म्हणाले.

यावेळी अमोल लांडे, सरपंच विठ्ठल बो-हाडे,  हिरडा कारखाना संचालक ज्ञानेश्वर विरणक, आरपीआय उपाध्यक्ष मारूती वारे हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा